॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥
पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती ।
सगुण रूपाने येऊन स्वामी, स्वीकारा आरती ॥धृ.॥
हरी हर संगे ब्रह्मदेवही, खेळे तव भाळी । पुनव हासते प्रसन्नतेने मुख चंद्राचे वरी ।
लाजविती रवि तेजाला, तव नयनांच्या ज्योती । सगुण रूपाने येऊन स्वामी, स्वीकारा आरती ॥१॥
पुण्यप्रद तव नाम असावे, सदैव या ओठी ।श्वासासंगे स्पंदन व्हावे, तुझेच जगजेठी ।
अगाध महिमा अगाध आहे, स्वामी तव शक्ती । सगुण रूपाने येऊन स्वामी, स्वीकारा आरती ॥२॥ धर्माचरणी पावन व्हावे, सदा असो सन्मति । सत्कर्माचा यज्ञ घडावा, झिजवुनि ही यष्टी ।
सन्मार्गाने सदैव न्यावे, घेऊनी मज हाती । सगुण रूपाने येऊन स्वामी, स्वीकारा आरती ॥३॥ अहंपणाचा लोप करुनि, कृतार्थ जीवन करा । पावन करुनी घ्यावे मजला, तेजोमय भास्करा ।
अल्पचि भिक्षा घालुनि, स्वामी न्यावे मज संगती । सगुण रूपाने येऊन स्वामी, स्वीकारा आरती ॥४॥
No comments:
Post a Comment