दत्त दत्त ऐसे लागले ध्यान ...

श्रीदत्त: शरणं मम

Jul 29, 2020

चित्त स्थैर्यकारक स्तोत्र


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ अनसूया अत्रिपासून संजात । दत्तात्रेया तू महाबुद्धीमंत । सर्व देवांचा अधिदेव प्रख्यात । माझे चित्त करी स्थिर ॥ १ ॥ शरण आलेल्यांचा जगात । दीनांचा तारक अखिल कर्ता ज्ञात । सर्वचालक देवा तू त्वरित । माझे चित्त करी स्थिर ॥ २ ॥ सर्व मंगलाचे मंगल पावन । सर्व आधिव्याधींचे औषध महान । सर्व संकटांचा हर्ता तू शोभन । माझे चित्त करी स्थिर ॥ ३ ॥ स्मरताक्षणी स्वभक्तांना । भेटसी आरोग्यप्रदा रिपुनाशना । भुक्तिमुक्ति दाता तू सर्वांना । माझे चित्त करी स्थिर ॥ ४ ॥ सर्व पापांचा क्षय करी । ताप दैन्य सारे निवारी । अभिष्टदात्या प्रभो तू सावरी । माझे चित्त करी स्थिर ॥ ५ ॥ जो हे श्लोक पंचक वाचेल । नित्यनेमें नियम चित्त निर्मळ । स्थिर चित्त तो होईल । भगवत्कृपापात्र जगती ॥ ६ ॥ ॥ इति श्री परमहंस परिवाज्रकाचार्य वासुदेवानंदसरस्वतीविरचितं मनःस्थिरीकरणं स्तोत्रं संपूर्णम् ॥


॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥


1 comment:

  1. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌸

    ReplyDelete