दत्त दत्त ऐसे लागले ध्यान ...

श्रीदत्त: शरणं मम

Mar 8, 2019

श्री गुरुदत्तराज मूर्ती ओवाळीतो प्रेमे आरती


॥ श्री गणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥


श्री गुरुदत्तराज मूर्ती ओवाळीतो प्रेमे आरती ॥धृ॥

ब्रह्मा विष्णू शंकराचा, असे अवतार श्री गुरुचा  

कराया उद्धार जगाचा, जाहला बाळ अत्रीऋषीचा 

धरीला वेष असे यतीचा, मस्तकी मुगुट शोभे जटांचा 

कंठी रुद्राक्ष माळ धारोनी, हातामध्यें आयुधें धरुनी, भक्तांचे क्लेश हरती 

त्यासी करुनी नमन, होई अघशमन, होई रिपुदमन, गमन असे त्रैलोक्यावरती ॥१॥

गाणगापुरी वस्ती ज्याची, प्रीती औदुंबर छायेची 

आवड भीमा-अमरजा संगमाची, भक्ती बहुत सुशिष्यांची 

वाट दावूनी योगाची, ठेवही देत असे निज मुक्तीची 

काशी क्षेत्र स्नान करितो, करवीरी भिक्षेला जातो, माहुरी निद्रेला येतो 

तरतरीत छाटी, झरझरीत नेत्र, गरगरीत शोभतो त्रिशुळ जयां हाती ॥२॥

अवधुत स्वामी सुखानंदा, ओवाळीतो सौख्यकंदा 

तारी हा दास हृदयकंदा, आलो शरण अत्रिनंदा  

सोडवी विषय मोहछंदा, दावी सद्गुरू ब्रह्मानंदा 

चुकवी चौऱ्यांशीचा फेरा, घालीती षडरीपू मज घेरा 

गांजिती पुत्र पौत्र दारा, वदवी भजन, करवी पूजन, कृपा करी बळवंतावरती ॥३॥


No comments:

Post a Comment