दत्त दत्त ऐसे लागले ध्यान ...

श्रीदत्त: शरणं मम

Mar 3, 2018

नृसिंह सरस्वती चरित्र- कृपामूर्ती श्रीनृसिंहसरस्वती


श्रीपाद श्रीवल्लभ हा श्रीदत्तप्रभूंचा दुसरा अवतार. ‘कलौ श्रीपाद श्रीवल्लभ:’ अशी या अवताराची ख्याती आहे. श्रीनृसिंह सरस्वती हे श्रीदत्तप्रभूंचे तिसरे आणि श्रीपाद श्रीवल्लभांचे उत्तरावतार आहेत. तेच पुढे श्री अक्कलकोट स्वामी समर्थ म्हणून प्रसिद्धी पावले. 

श्रीनृसिंह सरस्वती दत्तोपासनेचे संजीवक होते. तेराव्या शतकाच्या अखेरीस दत्तोपासनेच्या पुराणप्रवाहात संजीवन ओतण्याचे कार्य श्रीनृसिंह सरस्वतींनी केले. समग्र महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात ते दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरले. श्री नृसिंह सरस्वतीचा अवतार काल शके १३०० ते १३८० (इ.स. १३७८ ते १४५८) असा आहे. श्रीगुरुचरित्र हा अपूर्व ग्रंथ दत्तसंप्रदायाचा वेदतुल्य, प्राणप्रिय ग्रंथ आहे. प्रापंचिकांचा आणि पारमार्थिकांचा तो मनोकामना पूर्ण करणारा चिंतामणीच आहे. या वेदतुल्य गुरुचरित्राचे चरित्रनायक आहेत. श्री नृसिंह सरस्वती. श्री गुरूचरित्रात अध्याय ११ ते ५१ या अध्यायात त्यांचे समग्र लीलाचरित्र आलेले आहे. श्री नृसिंह सरस्वती संन्यासधर्माचे सर्वोत्तम आदर्श होते. 

तू भक्तजना कामधेनु । मनुष्यदेही अवतरोनु । तुझा पार न जाणे कवणू । त्रैमूर्ती तूच होसी ।।

श्री गुरूंच्या लीलाकथा श्रीगुरूचरित्रात आलेल्या आहेत. आजही श्री गुरु गाणगापुरातच आहेत. भक्तांना ते दर्शन देतात.


श्री नृसिंह सरस्वती चरित्र - कृपामूर्ती श्रीनृसिंहसरस्वती


सौजन्य : http://www.dattamaharaj.com/


No comments:

Post a Comment