दत्त दत्त ऐसे लागले ध्यान ...

श्रीदत्त: शरणं मम

Jan 15, 2017

दत्ता मजला प्रसन्न होसी...


॥ श्री गणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

दत्ता मजला प्रसन्न होसी जरि तूं वर देसी । तरि मी आनन मागें तुजसी निर्धारुनी मानसी ॥धृ.॥ स्मरण तुझें मज नित्य असावे तव गुण भावे गावे । अनासक्तिने मी वागावे ऐसे मन वळवावे ॥१॥ सर्व इंद्रिये आणि मन हें तुझे हाती आहे । यास्तव आतां तू लवलाहें स्वपदी मन रमवावे ॥२॥ विवेक आणि सत्संगति हे नेत्रद्वय आहे । वासुदेव निर्मल देहें जेणें त्वत्पदीं राहे ॥३॥ दत्ता मजला प्रसन्न होसी जरि तूं वर देसी। तरि मी आनन मागें तुजसी निर्धारुनी मानसी ॥४


No comments:

Post a Comment